एकदा शिवाजी महाराज मला भेटले ......

Return to Site                  


 

एकदा महाराज मला भेटले

झोपेत पाहून जोरात कडाडले

" अरे मावळ्या झोपतोस काय ?

कोंबडा आरवला ऐकू येत नाही काय ? "

" महाराज हयात दोष माझा नाय

थंड AC आणि गजराच्या युगात

कोंबड्याच महत्व तरी काय ...... ? "

 

महाराज हसले अणि म्हणाले

" चल भवानी मातेच दर्शन घेउया

ह्या युगातला महाराष्ट्र पाहुया "

दर्शन घेउनी महाराजांनी सर्व किल्ले पाहिले

शेवटी रायगडा वर येउनी स्तब्ध राहिले

म्हणाले," काय  रे दशा झाली या किल्ल्यांची आज ?

ज्यांना पाहुनी डगमगले होते पातशाही ताज !!! "

मी म्हणालो ," महाराज, अहो इथे इतिहास आठवतो तरी कुणाला आज ?

रेव्ह पार्ट्या करतांना ह्या लोकांना वाटत नाही लाज...! "

 

महाराज विचलित झाले

म्हणाले," चल येथून जाऊ यात

महाराष्ट्राची  राजधानी पाहुयात "

महाराजांसोबत मुंबईत आलो

तिथल्या झगमगाटात पूर्णपणे हरवलो

मुंबई बघता बघता २६/११ प्रसंग ऐकविला

तळपायाची आग मस्तकाला गेलेल्या महाराजांनी मलाच प्रश्न केला

"तुम्ही त्या नराधमाला जित्ता कैसा सोडिला ?"

उत्त्तर काय देणार माझाच चेहरा पडला

म्हणालो महाराज ,"तो पहा तो कसाब त्यानेच हा प्रसंग घडविला

पण आजच्या लोकशाहीत न्याय आहे प्रत्येकाला ..........

 

नाही तो फक्त माणुसकीला ....!!!

                                     ---- पंकज पवार

 

 
 
 
 
 
 Return to Site