If you do not hope, you will not find what is beyond your hopes.

-St. Clement of Alexandra

 

Welcome to the E-magazine. (TEESAKATTA)

TEESAKATTA is the monthly magazine released by the Department of Electronics and Telecommunication, Government College of Engineering, Aurangabad.
    'कट्टा' हा शब्द खास कॉलेज जीवनाचा आहे. तरुण-तरुणींच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असतो हा कट्टा. इतका की आज हॉटेल्स चे cafe झाले, पत्रांचे sms झाले, साध्या recorder पासून High speed USB पर्यंत आलो तरी कट्टा मात्र आजही तसाच राहिला आहे.
    कट्टा ही एक ठराविक जागा नसते. वडापावच्या गाडीपासुन Prozone मधल्या KFC पर्यंत कोणतीही जागा ही कट्टा असू शकते. मुळात म्हणजे कट्टा ही फक्त एक जागा नसून ती एक संकल्पना आहे.

    आज जग कितीही fast झालेले असले तरी कट्टा ही जागा असते विसाव्याची, क्षणभर विश्रांतीची. Submission झाल्याचा आनंद असो वा teacher ओरडल्याचा राग, Break up चे दुख असो किंवा नवीन कोणाला पटवायचे plans, Placement चे कौतुक असो किंवा KT लागल्याचे सांत्वन... हे सारे होत असते ह्या कट्ट्यावरचं.
    seniors चे सल्ले आणि juniors शी वाढते interaction शक्य होते ते ह्या कट्ट्यामुळेच... अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून रणबीर कपूरच्या Rockstar पर्यंत सर्व गोष्टींवर चर्चा होते ती इथेच .(मित्रांनी मारलेल्या फेक्याही आपण इथेच ऐकतो).
कोणाला ह्या कट्ट्यावर एखादी कविता सुचते, तर कोणाला एखादी कल्पना. अनेकदा ह्या कट्ट्यांवर सुचलेल्या कल्पनांचा भावी जीवनात वटवृक्ष बनतो. आणि अनेकांची आयुष्याच्या जोडीदाराची निवड होऊन प्रेम कहाणी फुलते.
    असा हा कट्टा. ह्या कट्ट्यावरूनच कॉलेजचे culture ठरत असते आणि काळानुसार ते develop होत जाते. हीच असते ती जागा प्रोत्साहन देण्याची, धीर देण्याची आणि आनंद वाटण्याची. म्हणूनच प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या कट्ट्याला अनन्यसाधारण महत्त्व असते. पण आजच्या धावपळीच्या जगात कट्ट्यावर बसण्यासाठी वेळ कोणाकडे आहे?
म्हणूनच मित्रांनो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय हा खास online कट्टा! हा कट्टा आपल्याला technologically update तर ठेवेलच शिवाय आपले मनोरंजनही करेल. कधी नवीन projects ची माहिती घेऊन, कधी motivate करणारे लेख घेऊन, तर कधी 'त्याच्या' मनातल्या 'तिच्या' साठी एखादी special कविता घेऊन, फावल्या वेळात डोक्याला चालना देणारी कोडी घेऊन, तर कधी आठवणींच्या कप्प्यातले काही खास क्षण जपून ठेवण्यासाठी कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले photo घेऊन आपल्या भेटीसाठी येत आहे 

                                                               
"TEESA कट्टा"

 चला तर मग मित्रांनो पुन्हा एकदा कट्ट्याचा आनंद लुटूयात आपल्या सर्वांच्या TEESA कट्ट्यावर बसून...